1) भारतासाठी युक्रेनचे संकट हे कट्टर मित्र रशिया आणि पश्चिमेतील नवीन मित्र यांच्या दबावाचा सामना बनला आहे.
2) रशिया हा भारताचा शस्त्रास्त्रांचा सर्वात महत्वाचा पुरवठादार आहे, बॅलेस्टिक मिसाईल पाणबुडी, २७२ सुखोई ३० फायटर जेट विमाने, किलो क्लासच्या पाणबुड्या आणि 1,300 पेक्षा जास्त T-90 टँक्स रशियाने भारताला पुरवले आहेत.
3) अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारत रशियाकडून 5 अब्ज डाॅलरची S-400 हवाई क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्यावर ठाम राहिला आहे.
4) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सर्व मुद्द्यांवर रशिया भारताच्या पाठीशी उभा राहिला आहे.
अशा अनेक कारणांमुळे मोदी सरकार सावध आहे.