अधिदैवत तू ह्या राष्ट्राचे अधिष्ठान तू संघटनेचे || Rss Geet ||
अधिदैवत तू ह्या राष्ट्राचे अधिष्ठान तू संघटनेचे ।
अधिदैवत तू ह्या राष्ट्राचे अधिष्ठान तू संघटनेचे
युगायुगांच्या मार्गदर्शका, प्रणाम घे हे गुरुपूजेचे ॥घु.॥
राष्ट्र उभे सुखदु:ख भोगता
समन्वयाने येई नविनता
संजीवन तू मूळ तत्त्वता
स्मरण देत तू पराक्रमांचे, प्रणाम घे हे गुरुपूजेचे ॥१॥
विजिगीषूचे युद्ध पेटता
पाहिलास रविही काजळता
परी तुझ्यातुन अमृत स्रवता
विेश पाठ घे सुसंस्कृतीचे । प्रणाम घे हे गुरुपूजेचे ॥२॥
तूच शिकविसी विेशबंधुता
विविधतेतुनी ती समरसता
तूच उगम आणि तूच सांगता
आद्यपीठ मानवधर्माचे । प्रणाम घे हे गुरुपूजेचे ॥ ३ ॥
मानबिंदु तु भारतभूचा
धर्म संस्कृती परंपरेचा
इतिहासातिल आदर्शाचा
सदा चिन्ह तू नवक्रांतीचे । प्रणाम तू घे हे गुरुपूजेचे ॥ ४ ॥
तू भगवा ध्वज जीवनदाता
समाज पालन रक्षण कर्ता
अमर राहणे तुझीच क्षमता
साम्य तुझ्याशी भगवंताचे प्रणाम धे हे गुरुपूजेचे ॥५॥