या मातीचे आमुचे नाते या मातीचे अमुचे नाते अतूट अतीव पिढ्यापिढ्यांचे उन्नत माथा तिचा करावा ध्येय आमुचे जन्मभराचे ॥धृ॥
या मातीचे० या ध्येयास्तव सोसू विपदा जोडू आम्ही सकल संपदा मृत्युंजयही होऊ आम्ही पूर्ण कराया संकल्पाते ॥१॥
या मातीचे० संकल्पहि ना केवळ कल्पित संघबलावर असती स्वीकृत लोकमानसी भारुन देती देशभक्तिचे मुगाट भरते ॥२॥
या मातीचे० चळो न पाउल अता कुठेही दृष्टि स्थिरावी सदैव ध्येयी कृती-मतीची संगत राहो हीच विनवणी परमेशाते ॥३॥
या मातीचे० श्वास श्वासही हो प्राण नवा क्षण क्षण कार्यी नित्य हवा अणुरेणू तव उजळून जावा आस मनी ही भारतमाते ॥४॥
या मातीचे नाते अमुचे
Your email address will not be published. Required fields are marked *