25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हिमाचल प्रदेश मधील एका छोट्याश्या गावातून संरक्षण मंत्रालयात एक पत्र आलं. ते पत्र लिहीलं होतं एका शाळेतील शिक्षकाने. त्यांनी त्यात पुढील प्रमाणे विनंती केली होती. त्यांनी त्यात विचारले होते की अगदी सहज शक्य झाल्यास मला आणि माझ्या पत्नीला ज्या जागेवर आमच्या मुलाला कारगिल युद्धात वीरमरण आलं ती जागा पहायला मिळेल का? 7/7/2000 या दिवशी त्याचा पहिला स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने आम्हा उभयतांना ती जागा ते स्मारक पहायची इच्छा आहे. जर शक्य नसेल तर राहूदेत. जर असं करणं राष्ट्रीय सुरक्षेच्या विरूद्ध असेल तर मी माझा अर्ज मागे घेतो.
ज्या अधिकाऱ्याने हे पत्र वाचलं. या दोघा उभयतांना इथे घेऊन येण्यासाठी डिपार्टमेंट कोणतीही कारवाई करणार नसेल तर मी माझ्या पगारातून त्यांचा प्रवास खर्च करण्यास तयार आहे. पण मी स्वतः त्या दोघांना त्या स्मारका पर्यंत घेऊन जाईन. आणि त्याने तसे फर्मान काढले. त्या मुलाच्या स्मृतीदिनाच्या दिवशी त्या वृध्द सन्मानाने आणण्यात आलं. आणि जिथे त्यांच्या मुलाला वीरमरण आलं त्या जागेवर नेण्यात आलं. तेव्हा सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहून मानवंदना दिली. एका सैनिकाने एक पुष्पगुच्छ त्या माता पित्याच्या हाती दिला आणि त्यांना वाकून नमस्कार केला. आणि मानवंदना दिली. त्या दिवंगत मुलाचे वडील म्हणाले ‘तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही मला नमस्कार का करत आहात.? तो सैनिक म्हणाला अखेरच्या क्षणापर्यंत तुमच्या मुलाच्या सोबत असणारा आणि त्याचा पराक्रम जवळून पहाणारा असा मी इथे एकटाच आहे.
पाकिस्तानी सैनिक दर मिनिटाला त्यांच्या हेवी मशीनगन्स मधून 100 ते125 गोळया झाडत होते. आमच्यापैकी पाच जण 30 फुटां च्या अंतरावरील एका दगडामागे लपून बसलो होतो. मी मृत्यूच्या गुहेत जायला तयार आहे. मी त्यांच्या गोळ्या झेलत त्यांच्या खंदकात जाईन आणि स्फोटके फेकून परत येईन. त्यानंतर तुम्ही त्यांच्या खंदकावर कब्जा करू शकाल. मी शत्रूच्या खंदकाकडे जायला निघालोच होतो. तेवढ्यात तुमचा मुलगा मला म्हणाला.’तु वेडा आहेस का? तुझं लग्न झालेलं आहे. तुला बायका मुलं आहेत. मी अजून अविवाहित आहे. मृत्यूच्या गुहेत मी जातो. तु फक्त मला कव्हर कर.’ आणि क्षणार्धात त्याने माझ्या हातून स्फोटके घेतली आणि तो निघून गेला.
पाकिस्तानी सैन्याच्या मशीनगन्स पावसा प्रमाणे गोळ्या बरसवत होत्या. तुमच्या मुलाने त्या चुकवल्या आणि पाकिस्तानी सैन्याच्या खंदकात जाऊन पोहोचला. स्फोटकावरची पिन काढून त्याने ते खंदकात फेकले. आणि 13 पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले. त्यांचे घनघोर सुरू असलेले युद्ध संपले आणि तो परिसर आमच्या ताब्यात आला. मी तुमच्या मुलाचे शव उचलले. त्याच्या शरीरात 42 गोळया घुसल्या होत्या. मी त्याचे डोके माझ्या मांडीवर घेतले. त्याचे शेवटचे शब्द होते जयहिंद.
त्याचे शव तुमच्या गावाला घेऊन येण्यासाठी मी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. पण त्यांनी ती नाकारली. मला त्याच्या चरणांवर ही फुले वहाण्याची संधी मिळाली नाही. म्हणूनच मी ही फुले तुम्हाला अर्पण करत आहे. त्या शिक्षकाची बायको हळुवार स्फुंदत होती. तो शिक्षक मात्र मुळीच रडला नाही. ते म्हणाले, मी माझ्या मुलासाठी तो सुट्टीवर घरी येईल तेव्हा घालायला शर्ट आणला होता. पण तो कधीच सुट्टीवर घरी आला नाही. आणि आता तर येणारही नाही. म्हणूनच त्याच्या स्मारकावर अर्पण करण्यासाठी तो शर्ट आणला होता. पण बाळा आता त्याच्याऐवजी तु तो शर्ट घालशील का?
कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या त्या सैनिकाचं नाव होतं विक्रम बात्रा. त्याच्या वडिलांचं नाव होतं गिरधारी लाल बात्रा आणि त्याच्या आईचं नाव होतं कमल बात्रा.