गणितात कोणतीही संख्या १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्याने भागता येत नाहीत, पण ही एक संख्या अशी विचित्र आहे की जगातले सर्व गणितज्ञ आश्चर्याने चकित झाले. ही संख्या भारतीय गणितज्ञांनी आपल्या अचाट बुद्धीने शोधली…! ही संख्या – २५२० पहा. ही इतर अनेक संख्यांपैकी एक आहे असे दिसते पण वास्तव्यात मात्र तसे नाही, ही अशी संख्या आहे जगातील अनेक गणितज्ञांना थक्क करून सोडले !
ही विचित्र संख्या १ ते १० यापैकी प्रत्येक संख्येने भाग जाणारी आहे, ती संख्या सम वा विषम असली तरीही. ह्या संख्येला १ ते १० पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी शून्याचे रहाते. खरोखरच ही अद्भूत व अशक्य अशी संख्या वाटते ! आता पुढील टेबल पहा, वरील विधानाची सत्यता स्वतः अनुभवा.
२५२० या संखेचे रहस्य [ ७ × ३० × १२ ] या गुणाकारात दडले आहे.
भारतीय हिंदू संवत्सरच्या अनुषंगाने या २५२० संखेचे कोडे उलगडते,जे या संखेचे गुणाकार आहे.
एक आठवड्यांचे दिवस (७), एका महिन्याचे दिवस (३०) व एका वर्षाचे महीने (१२)
[७×३०×१२=२५२०]
हेच आहे भारतीय कालगणनेचे वैशिष्ट्य व श्रेष्ठत्व ! भारतवर्षाने विश्वाला निरपेक्षतेने ज्ञान दिले नव्हे नव्हे ज्ञानभांडार दिले . विज्ञानाचा उत्तुंग अविष्कार म्हणजे भारतीय संस्कृती !! ज्ञानदानाने ज्ञान वाढते या दृढ विश्वासामुळे आपल्या ऋषीनी(शास्त्रज्ञानी *पेटंट्स *घेतले नाहीत . म्हणुन त्यांचे महत्व कमी होते का? बील्कुल नाही . पुर्वसुरीनी हे आपल्यासाठी जे संचित ठेवलेय त्याचा नुसता पोकळ अभिमान न बाळगता या प्रगल्भ संस्कृतीचा प्रसार होणेसाठी या अशा बाबी शोधुन;अभ्यासुन ;वैज्ञानिक कसोट्यांवर पुन: एकदा घासुन/तपासुन प्रसारायला हव्यात .
भारतवर्ष जगाचा गुरु आहेच म्हणुन आपली जबाबदारीही वाढते हे लक्षात घेवुन दिवसातील किमान काही वेळ तरी संस्कृतीचा (काही लोक यास हिंदु/वैदिक धर्म असे संबोधुन त्यास मर्यादा घालतात)
अभ्यास/ अध्ययन करावे ; बघा आनंद मिळेल .
साभार – अप्पा पाध्ये गोळवलकर ; गोळवली;कोंकण . @८७६७०७१७०५