नाशिक – पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. सुशील पारख, डॉ. श्रीकला काकतकर, डॉ. किरण मोटवानी, रितेश कुमार आदी.अशोका मेडिकव्हरमध्ये ५८० ग्रॅम वजनाच्या बाळाला जीवदान
नाशिक – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा आपल्या कौशल्याने प्री-मॅच्युअर बाळाला जीवदान दिले आहे. एका २७ वर्षीय महिलेला गरोदरपणात अनेक गंभीर अडथळ्यांचा सामना करावा लागला. वरिष्ठ आणि अनुभवी बालरोगतज्ज्ञ डॉ. सुशील पारख यांच्या नेतृत्वाखाली स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकला काकतकर, डॉ. प्रणिता संघवी, डॉ. किरण मोटवानी, डॉ. नेहा मुखी यांनी आपल्या अथक प्रयत्नाने २२ आठवड्यांच्या अकाली जन्मलेल्या मुलीचे प्राण वाचविले.
जन्माच्या वेळी तिचे वजन केवळ ५८० ग्रॅम होते. मात्र, अशातही डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने या चिमुकलीचे प्राण वाचविलले. दरम्यान, गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यांत ती महिला अशोका मेडिकव्हरमध्ये दाखल झाली होती. गर्भाशय उघडे असल्याने त्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. डॉ. श्रीकला काकतकर यांनी कौशल्याने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे प्रसूतीचा कालावधी दोन आठवड्यांनी पुढे ढकल्यात त्यांना यश आले. या शस्त्रक्रियेमध्य उघड्या गर्भाशयाला टाके घालण्यात आले आणि त्यामुळे बाळाला आणि आईला होणारा धोका टळला. नंतर प्रसूती झाली असता ५८० ग्रॅम वजनाच्या बाळाचा जन्म झाला.
त्यानंतर डॉ. पारख यांच्या मार्गदर्शनाखाली नवजात शिशू अतिदक्षता विभागात सेव देणारे अनुभवी कर्मचारी यांनी त्या बाळाची काळजी घेतली. अवघ्या काही दिवसांतच बाळाचे वजन १,६०० ग्रॅम इतके वाढले असल्याची माहिती केंद्रप्रमुख रितेश कुमार यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेनुसार सुमारे १५ दशलक्ष मुले प्रसूतीच्या पर्ण कालावधीच्या आधी जन्माला येतात. भारतात एकूण प्रसूतीपैकी, एक टक्का बाळांचा जन्म २८ आठवड्यांपूर्वी होतो आणि २४ आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांचा जगण्याचा दर ०.५ टक्के इतका कमी आहे.