भारताच्या सशस्त्र दलांचे सर्वोच कमांडर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवार २२ नोव्हेंबर २०२१ रोजी एका समारंभात शौर्य चक्र प्रदान केलेल्या सैनिकांना पाहण्यासाठी कृपया फोटोज वर क्लिक करा.
राष्ट्रपती कोविंद यांनी बिहार रेजिमेंट च्या ८ व्या तुकडीतील शिपाई कर्मदेव ओराओं यांना शौर्य चक्र प्रदान केले. शिपाई कर्मदेव ओराओं यांनी ऑप्रेशनल टास्कच्या पाठपुराव्यात अतुलनीय शौर्य दाखवले. त्यांच्या या धाडसी कारवाईमुळे दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
राष्ट्रपती कोविंद यांनी गढवाल रायफल्स च्या ६ व्या तुकडीच्या रायफलमन अजवीर सिंग चौहान यांना शौर्य चक्र प्रदान केले. रायफलमन अजवीर सिंग यांनी मनाची समयसूचकता आणि वयक्तिक सुरक्षेकडे दुर्लक्ष करत धाडस दाखवलं. आणि दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालून जम्मू काश्मीर मध्ये घुसखोरीचा प्रयत्न यशस्वी पणे टाळला.
राष्ट्रपती कोविंद यांनी सीआरपीएफचे कॉन्स्टेबल झाकेर हुसेन यांना शौर्य चक्र प्रदान केले. एका सच्या सैनिकाप्रमाणे आणि युद्धातल्या सहकार्याप्रमाणे कॉन्स्टेबल झाकेर हुसेन आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कमांडर सोबत लढले. सैन्यदलाच्या सर्वोच परंपरेचे पालन करत त्यांनी अनुकरणीय शौर्य दाखवले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर श्रीराम साबळे, ५३ इछ, उठझF, बारामुल्ला जम्मू आणि काश्मीर यांना शौर्य चक्र प्रदान केले. कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर श्रीराम साबळे यांनी सीआरपीएफच्या सर्वोच परंपरांचे पालन करून अत्यंत कठीण परिस्थितीत अनुकरणीय धैर्य आणि आपल्या कर्तव्याप्रति असाधारण बांधिलकी दाखवली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेड कॉन्स्टेबल सुभाष चंदर यांना शौर्य चक्र प्रदान करत आहेत. अत्यंत धोकादायक परिस्थितीत चार नागरिकांचे प्राण वाचवताना हेड कॉन्स्टेबल सुभाषचंदर यांनी अत्यंत धाडस दाखवत दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला.