९/११ चे भीषण हत्याकाण्ड ः दहशतवादी हल्ल्याची २० वर्ष
एखाद्या व्यक्तीची पुण्यतिथी म्हणजे कँलेंडर वरची एक तारीख. पण ९/११ सारख्या तारखा कधीच विस्मरणात जात नाहीत कारण दहशतवाद हा सहन करण्यासाठी नसतो. अमानुषता देखील सहन करता कामा नये. कोविड १९ सारखी आपत्ती सुद्धा असहनीय आहे. आपण त्यांना लक्षात ठेवायला हवं. आपल्यापेक्षा कैकपटीने जास्त त्रस्त लोक आहेत. त्यांना लक्षात ठेवा. आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला त्यांच्या मानाने खूपच कमी त्रास सहन करावा लागला. वैह्यसी पांडे म्हणतात. २० वर्षांपूर्वी आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत त्याच्या वडिलांचे मनोगत वाचा.
लेफ्टनंट कर्नल यांची लाडकी अमेरिकेत असलेली (मूळची भारतीय) चमकदार डोळ्यांची आणि लांब काळेभोर केस असलेली नात ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस २१ वर्षांची झाली. २० वर्षांपूर्वी त्या दोघांची अखेरची भेट झाली. मध्यंतरीच्या काळात त्याच्याशी कोणताही संबंध नव्हता. हे त्याचे दुर्दैव आहे असे त्याला वाटते. आपण तिला ओळखत नाही याची त्याला खंत आहे. पण अतीव दुःख आहे असे नाही. ८८ वर्षीय कर्नल थत्ते यांच्यासाठी तो नशीबावर विश्वास ठेवणारा आहे. तो लष्करी पार्शवभूमीचा असल्याने प्रत्यक्ष जीवनातही काहीसा कडक शिस्तीचा आहे. आणि जे धैर्य, धाडसी वृत्तीने त्याने तीन युद्धात भीषण संकटांचा सामना करत भारताची सेवा केली. दैवाने त्याच्या पदरात हर्षद नावाचा एकुलता एक मुलगा दिला. जो त्याच्या तीन मुलांपैकी तिसरा होता. खरतर आपल्याला दोनच मुले हवीत असे त्याने ठरवले होते. पण दैवाची इच्छा काही वेगळीच होती. जणू काही पुत्रवियोग त्याच्या नशिबातच लिहिलेला असावा अशा पद्धतीने नशिबाने त्याचा लाडका हर्षद सुद्धा त्याच्यापासून दोन दशकांपूर्वी हिरावून घेतला. या दुःखावर फुंकर घालण्यासाठी त्याच्या आयुष्यात त्याची नात आली. त्याच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी. पण नशिबाने तीही हिरावून घेतली. कदाचित कधीतरी ती परत येईल?
त्याची नात तिच्या वडिलांसारखी, कर्नल थत्ते यांच्या मुलासारखी दिसते. त्यांचे डोळे सारखे आहेत. २० वर्षांपूर्वी वर्ल्ड ट्रेड सेंटर नॉर्थ टॉवरच्या ९६ व्या मजल्यावर अमेरिकन एअर लाईन्सच्या फ्लाईट ने सकाळी पावणे नऊच्या दरम्यान जेव्हा हल्ला झाला मार्श आणि मॅक्लेनच्या ऑफिसमध्ये घुसखोर आले. त्यात हर्षद मारला गेला. जेथे तो अटलांटा स्थित एका कंपनीत ओरॅकल कॉर्पोरेशनच्या ७ आठवड्यांच्या असाइनमेंटवर काम करत होता. हर्षदच्या विसाव्या स्मृतिदिनी कोविड १९ सारखी महामारी जगाला उध्वस्त करत असताना सध्या पुण्यात स्थायिक असलेले कर्नल थत्ते आयुष्यात आपण काय कमावले आणि काय गमावले याचे चिंतन करत आहेत.
‘‘मी राजपूत रेजिमेंट मध्ये होतो. तीनही युद्धात माझा सहभाग होता. १९५२,१९७१, १९६५. १९७१ च्या युद्धात मी बटालियनचा कमांडिंग ऑफिसर होतो. माझ्या बरोबर १६ अधिकारी होते. आम्ही ६ अधिकारी गमावले सहा ठार आणि पाच जखमी झाले. आम्ही पंजाब सीमेवर फाजिल्का येथे होतो. कमांडिंग ऑफिसरसाठी सर्वच जूनियर्स हे मुलासारखे असतात. २००१ मध्ये मला कळले आता माझी पाळी होती. माझ्या मुलाचे निधन झाले होते. त्यामुळे मला परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी खूप धैर्य मिळाले. ’’ पण मला माझ्या बायकोची काळजी घ्यायची होती. तिला खूपच दुखापत झाली होती. मी जर तिच्यासमोर रडलो असतो तर ती आणखी खचली असती. मग मी गाडी काढली एकटाच लॉन्ग
ड-ाईव्ह वर गेलो. एकदाच जेवढं रडायचं होतं तेवढं रडून घेतलं आणि परत आलो. त्यानंतर मात्र मी पुन्हा कधीच रडलो नाही. ’’ तुम्ही काय वाटेल ते करा पण प्रत्येकाच्या नशीब हे आधीच ठरलेलं असतं. कोणालाही माहिती नसतंकी पुढे काय होणार आहे. कोण कशा पद्धतीने, केव्हा जाणार आहे. पुढे आपल्या ताटात दैवाने सुख वाढून ठेवलंय की दुःख हे सांगता येत नाही.ते वरून येताना लिहूनच पाठवलेलं असतं.कोणीही ते बदलू शकत नाही. तो ठामपणे सांगतो.
कर्नल थत्ते यांची स्मरणशक्ती खूपच चांगली आहे. शब्दलेखन अचूक आहे. फौजी असल्यामुळे ताठ कणा असलेले आणि आवाजामध्ये प्रचंड आत्मविश्वास असलेल्या थत्ते यांना मुलाच्या मृत्यूपूर्वीचा ११ सप्टेंबर २००१ चा प्रसंग आठवतो. जणू काही तो कालच घडला असावा. ते आणि त्यांची बायको विजया उत्तर पश्चिम मुंबईतील गोरेगावला मोठ्या भावाला भेटायला गेले होते. मागच्याच आठवड्यात शनिवारी ८ सप्टेंबर ला त्याचे हर्षदशी बोलणे झाले होते. सहजच गप्पा टप्पा झाल्या होत्या. हर्षदने त्याला त्याची बायको आणि लहान मुलीबद्दल सांगितले. नुकताच तिचा पहिला वाढदिवस साजरा केल्याचेही सांगितले. आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. मार्श आणि मॅक्लेन या कंपनीतली नोकरी संपली की भारतात परत येईन असेही सांगितले. हर्षद अटलांटाला शिफ्ट झाल्यापासून आठवड्यातून दोनदा आई बाबांशी त्याचे बोलणे होत असे. १९९९ साली हर्षद त्याच्या बायकोसह मुंबईहून अमेरिकेला शिफ्ट झाला होता.
हर्षद पक्का मुंबईकर नव्हताच कधी. त्याचे लहानपण, तरुणपण त्याच्या बाबांच्या सतत होणाऱ्या बदल्यांमुळे मुंबई, नवी दिल्ली, चुत्तगाँग (सिक्कीम), अभोर (पंजाब) येथे गेले होते. १३ व्या वर्षी तो मायो कॉलेज अजमेर येथे शिकायला गेला आणि त्याने त्याचे पोस्ट ग्रॅजुएशन उत्तर मुंबईतील NM कॉलेज मधून पूर्ण केले. त्याने मुंबईतील काही मोठ्या प्रसिद्ध कंपन्यांमध्ये अमेरिकेची असाइनमेंट घेण्याआधी काही वर्ष काम केलं आणि नंतर जॉर्जिया येथे ओरॅकलच्या ऑफिस मध्ये नोकरी केली. कर्नल म्हणतात मला आठवतं तो एक हुशार मुलगा होता ज्याने २४ वर्षांचा असताना बी कॉम आणि चार्टर्ड अकाऊंटटण्ट पूर्ण केलं. हर्षद आणि त्याची बायको अमेरिकेत खूप समाधानी होते. अमेरिकेने त्यांचे स्वागत केले.
त्याला कष्ट करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. तो व्यावसायिक वृत्तीचा माणूस होता. त्याला व्यवसाय करायचा होता. मी उत्तर ध्रुवावर जाऊन बर्फ सुद्धा विकू शकतो अशा तो बढाया मारायचा. स्वछ वातावरण, आव्हानात्मक काम यामध्ये अमेरिकेतील भारतीय मुलं चांगले काम करतात. थत्ते पुढे म्हणतात की हर्षद अतिशय साधा,सरळ मार्गाने जाणारा मुलगा होता.त्याच्यावर स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीचा प्रभाव होता तो त्याच्या कॉलेजच्या मित्रांमध्ये खूपच लोकप्रिय होता ज्यांना घेऊन त्याने Legacy.com नावाचा क्लब स्थापन केला होता. Legacy.com कडून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली.
हर्षद आणि त्याच्या बायकोला ऑगस्ट २००० मध्ये मुलगी झाली. थत्ते आणि त्यांची बायको नातीच्या जन्माच्या वेळी महिनाभर अमेरिकेत होते. सुनेला मार्गदर्शन करण्यासाठी. ते आनंदाचे दिवस होते ज्यांनी आम्हाला सुंदर आठवणी दिल्या.थत्ते म्हणतात बाळाचा जन्म आम्ही साजरा केला. संपूर्ण घर सजवले. ती खूपच आनंदी होती कारण ती जेव्हा हॉस्पिटल मधून बाळाला घेऊन घरी आली तेव्हा तिचे जंगी स्वागत झाले. २००१ च्या मध्यावर मार्श आणि मॅक्लेन च्या प्रोजेक्ट मुळे हर्षदला न्यूयॉर्क शहरात शिफ्ट व्हावे लागले. हर्षद तेथे तात्पुरता कामावर होता आणि त्याच्या मृत्यूपूर्वी तीनच आठवडे कामावर रुजू झाला होता. प्रोजेक्ट मॅनेजर आजारी असल्याने तो वीकएंड ला त्याच्या घरी जाणार होता शुक्रवारी शेवटची फ्लाईट पकडून सोमवारी त्याला न्यूयॉर्क ला परत जायचे होते. तो नेहमी चरपहरींींशप येथील हॉटेल मधील रूम नंबर १००९ मध्ये राहत असे. त्याचे काम संपायला फक्त चार आठवडे शिल्लक होते. त्यानंतर त्याला नॉर्थ टॉवरमध्ये कधीच यायचे नव्हते.
नशीब वगळता ज्याचा थत्त्यांनी नेमीचं आदर केला हर्षद टॉवर सोडणार नाही याची खात्री केली कंपनीतील इतरांनीही टॉवर कधीच सोडला नाही. नेहमी प्रमाणे थत्ते यांनी भावाच्या घरी ११ सप्टेंबर २००१ रोजी बातम्या पाहायचे ठरवले. त्या भयंकर दिवशी संध्याकाळी मी आणि माझी बायको सहाच्या सुमारास भावाच्या घरी भेटायला गेलो. संध्याकाळी सहा सातच्या बातम्या पाहायची सवय मला होती. आम्ही टीव्ही लावला आणि विमाने फिरताना, आदळताना दिसली दुसरे विमान दुसऱ्या टॉवर ला धडकताना दिसली. नॉर्थ टॉवरला आधीच आग लागली होती. आम्हाला हे माहित नव्हते की हर्षद ९६ व्या मजल्यावर आहे. आणि आमच्याकडे त्याचा नंबर ही नव्हता. हे काय भयानक सुरु आहे. आम्ही कुजबुजलो. माझी बायको म्हणाली तो याच ठिकाणी होता.
थत्ते आणि त्यांच्या बायकोने सर्व व्यवस्थित असावे अशी प्रार्थना करत अंधेरीतील घर गाठले. हर्षद ला फोन करण्याचा प्रयत्न केला पण कोणीच फोन उचलला नाही. म्हणून त्याच्या बायकोसाठी निरोप ठेवला. जेव्हा हर्षदच्या बायकोशी त्यांचा संपर्क झाला तेव्हा ती आज सकाळीच त्याच्याशी बोलणे झाले आहे असे म्हणाली. किंवा कदाचित परवा रात्री. त्यानंतर ( विमानांनी टॉवर ला धडक दिल्यानंतर) ती हर्षद ला एकसारखा फोन करत होती. पण पलीकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. कदाचित तो आधीच गेला असावा. थत्ते भावना विवश झाले. या आठवणींमुळे त्यांचे मन नकोशा वाटणाऱ्या भूतकाळातील त्या घटने कडे वळले ज्यामुळे त्यांचे जग उध्वस्त झाले होते.
त्यांनी लगेचच त्यांच्या सुनेला हर्षद च्या मोठ्या बहिणीकडे न्यू यॉर्क सिटी मधील न्यू जर्सी येथे जायला सांगितले. आणि तिथेच थांबून हर्षद ची काही बातमी येते का ते पाहण्यास सांगितले. ट्वीन टॉवर्स च्या या घटनेनंतर अमेरिकेतील विमानांची उड्डाणे खूप दिवस बंद होती. जखमी, हादरलेली अमेरिका कित्येक दिवस बंद होती. हर्षदच्या कंपनीने त्याची बायको आणि मुलगी यांना अटलांटाहून न्यू यॉर्क सिटी पर्यंत पोचवण्यासाठी गाडी पाठवली. हा प्रवास अत्यंत त्रासदायक आणि लांब होता.
थत्ते आणि त्यांच्या बायकोला आणि हर्षदच्या सासऱ्यांना अमेरिकेची फ्लाईट शोधायला १० दिवस लागले. हे तिघेही आपला मुलगा खरंच वारला आहे की नाही याची खात्री करून घ्यायला न्यू यॉर्कमध्ये आले होते. पण मार्श मॅक्लेन कंपनी ची ती जागा पाहिल्यावर त्यांची खात्रीच पटली की आता सर्व संपले आहे. अल कायदा ने जी विमाने हल्ला करण्यासाठी मोहोमद अता याच्या नेतुत्वाखाली पाठवली होती त्यांनी ९३ ते ९९ मजल्यांवर धडक दिली. टोनी विंडो या जागतिक हॉटेलच्या बरोबर खाली. तो आम्हाला म्हणाला मी खुर्ची फिरवली आणि मला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दिसायला लागली. जर विमानांची उंची ९३ ते ९९ मजल्यांच्या मध्ये असती तर. त्याचं टेबल त्याच भागात होत. तो विमानाच्या बाहेर आणि प्रवासी विमानाच्या आत एवढाच काय तो फरक होता. शेवटी ते नशीबच होत जे त्याचा गूढ खेळ खेळत होतं. नशीब हे की सहकारी आजारी असल्याने हर्षद ला मॅक्नले कंपनीचा Manhatten येथील प्रोजेक्ट सांभाळावा लागला. दुर्दैव हे होतं की त्याच्या कामाचे काहीच आठवडे शिल्लक होते त्यानंतर तो तिकडे कधीच जाणार नव्हता.कदाचित अटलांटा मधील आपल्या घरी सुरक्षित राहणार होता. दुर्दैव हे होतं की हर्षद त्यावेळी ९६ व्या मजल्यावर होता. थत्ते यांना स्पष्ट दिसत होतं की आता आशा ठेवण्यात काहीच अर्थ नाही. त्यांनी ताबडतोब सुनेच्या आणि नातीच्या भविष्याचा विचार करायला सुरुवात केली.नवीन देशात ते दोघे एकटेच होते.
अमेरिकेचा व्हिसा होता आणि अपुरे आर्थिक पाठबळ होते. नात खूप लहान होती. त्या दोघांना नवीन सुरुवात करण्यासाठी मदत करणे हे कर्नल चे कर्तव्य होते. त्यांनी मुलीच्या बाबांशी बोलायचे ठरवले. मी म्हणालो हे बघा हे असे आहे. आम्ही आमचा मुलगा कायमचा गमावला. आता आम्हाला आमच्या सुनेचा आणि नातीचा विचार करायला हवा. त्यांना अजून आयुष्य काढायचं आहे तुमची मुलगी फक्त २७ वर्षांची आहे. तुम्ही तुमच्या मुलीसाठी स्थळं बघायला सुरुवात करा. त्यांच्या सुनेच्या बाबांना भारतात परतावे लागले कारण त्यांची रजा संपली होती. थत्ते आणि त्यांच्या बायकोने सुनेसोबतच सहा महिने राहण्याचा निर्णय घेतला. हेतू हाच की ती लवकर सावरावी. परत हा नशिबाचाच भाग होता. नॉर्थ कॅरोलिनामध्ये एक डॉक्टर होता. तो आणि त्याच्या बायकोने एकत्रच मेडिकल चे शिक्षण घेतले होते. लग्न करून ते दोघे अमेरिकेला आले. १९९६ -९७ साली लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करायला ते फ्लोरिडा ला गेले. तेथून परत येताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. ज्यात डॉक्टरची बायको जागीच गेली. तो एकटाच होता. चार वर्ष त्याने लग्न केले नाही. पण जेव्हा तो भारतात येत असे तेव्हा तो पहिल्यांदा त्याच्या सासू सासऱ्यांना भेटायला जाई. मग आई बाबांकडे जाई. खूपच चांगला मुलगा आहे. आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला तो भेटला. ते काही वेळा भेटले. आणि पुढच्या वर्षी डिसेंबर मध्ये त्यांनी लग्न केले. सर्व जण उपस्थित होते. थत्ते उभयतांसाठी हा आनंदाचा क्षण होता. त्यांच्या नातवंडांना पुन्हा एकदा आई बाबा दोघांचे प्रेम मिळू शकेल याचा त्यांना आनंद होता.
थत्ते म्हणाले जेव्हा गुरुजी नी विचारले हिच्या सासरचे कुठे आहेत तेव्हा ते म्हणाले हो मी इथेच आहे. गुरुजी म्हणाले त्यांनी कन्यादान करावे. मुलगी दूरदेशी आहे. त्यामुळे आम्ही कन्यादान करू काही हरकत नाही ना. असे म्हणून मी स्वतः नातीला डॉक्टरांच्या हातात दिले. थत्तेंच्या सुनेने आणि नातीने नॉर्थ कॅरोलिना मध्ये नवीन आयुष्य सुरु केले. सुनेला नवीन साथीदार मिळाला आणि नातीला तिचे नवीन बाबा मिळाले. आणि नातीला आता दोन भावंडे मिळाली. या अपघाताने पीडितांना दिलेल्या नुकसान भरपाई वरून गैरसमज होऊन त्यांची सून आणि हर्षदच्या आईबाबांमधील आणि नाती मधील संबंध बिघडले. दोन्ही बाजूचे वकील होते. आणि सर्व प्रकारच्या गोष्टी घडत होत्या… त्यातून अनावश्यक कटुता निर्माण झाली. तिने (सून) शेवटी सांगितले की तिला आम्हाला भेटायचे नाही. आम्ही म्हणालो, ‘ठीक आहे’. ती तिची इच्छा आहे.
मी तिच्या सर्व मामी आणि मावशांच्या संपर्कात आहे. ते सर्व जण माझ्या संपर्कात आहेत. फक्त ती आणि तिचे आई वडील वगळता. आजही त्यांना काही फोटोज मिळाले की ते मला पाठवतात. तिचे मामा आणि मावशी जेव्हा नातीला भेटायला जात असतील तेव्हा ती आजी आजोबांबद्दल प्रश्न विचारतच असेल.ते देखील आमच्या बद्दल तिला सांगत असतील. त्यांची सून आणि नात भारतात आल्या आहेत. थत्ते आणि त्यांची बायको १९ वेळा अमेरिकेला जाऊन आले. काही वेळा वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील स्मारकाला भेटी दिल्या. सलग दोन वर्षे कर्नल थत्ते यांनी मृतांसाठीच्या रोल कॉलमध्ये भाग घेतला आणि ११ सप्टेंबर रोजी २० मृतांची नावे वाचून दाखवली आणि सिनेटर हिलरी क्लिंटन यांची भेट घेतली. २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना थढउ मध्ये हरवलेल्या भारतीयांच्या वतीने भेटलेल्या आणि बोलणाऱ्या पीडित कुटुंबांच्या ग्रुपचा ते आणि त्यांची बायको भाग देखील होते.
जेव्हा ते न्यूयॉर्कला जातात तेव्हा ते त्याच हॉटेल कंफर्ट इन् त्याच रूम १००९ मध्ये उतरतात जिथे हर्षद राहायचा. आम्ही तिथे राहिल्यावर आम्हाला असं वाटत की ही तीच जागा आहे जिथे हर्षदने शेवटचे काही तास घालवले. हर्षदच्या मृत्यूच्या वीस वर्षानंतर थत्ते यांचे आयुष्य बऱ्यापैकी स्थिर आणि बदलेले आहे. २०१४ साली त्यांची बायको गेली. ते पुण्याबाहेर वरिष्ठांच्या कॉन्डोमिनियम कॉम्प्लेक्स मध्ये राहायला गेले आहेत. व्यस्त वेळापत्रक असलेल्या त्यांचा दिवस पहाटे ५ वाजता सुरु होतो. एक तासाचा मॉर्निंग वॉक, कधी योग, कधी सेक्रेटरी म्हणून सोसायटीचे काम पाहणे, ३ ते ४.३० मध्ये पूल खेळणे. आणि रात्रीच्या जेवणा आधी टोट बरोबर काही वेळ घालवणे असा त्यांचा दिनक्रम असतो.
दरवर्षी ११ सप्टेंबर ला ते आणि त्यांच्या दोन मुली एकत्र येतात. पुण्याचे त्यांचे मित्र त्यांना शुभेच्छा पाठवतात. ९/११ चा विसावा स्मृतिदिन खूप महत्वपूर्ण होता. मी आणि माझ्या मुली जमलो होतो. आम्ही एकमेकांशी खूप बोललो. ते सर्व आम्ही कसे हाताळले याचे मागे वळून बघताना आश्चर्य वाटते. अर्थात आम्हाला हर्षदची आठवण येते.माझी धाकटी मुलगी हर्षद पेक्षा फक्त एक वर्ष नऊ महिन्यांनी मोठी होती. तिला हर्षदची आठवण येते.
कर्नल चे दहशत वादाबाबत विचार जहाल आहेत. तसे ते असणे स्वाभाविक आहे. भारताने इस्राईल प्रमाणे लष्करी छावण्यांचा बिमोड केला पाहिजे असे ते म्हणतात. जेव्हा लादेन मारला गेला तेव्हा ते म्हणाले की फक्त एका दहशतवाद्याला मारून उपयोग नाही तर लादेनला मारणे ही दहशतवादाविरुद्धच्या लढाईची सुरुवात असायला हवी. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हर्षदच्या तेव्हा आजारी असलेल्या सहकार्याचा थत्ते यांना फोन आला होता. ज्याच्या जागेवर त्यादिवशी हर्षद मॅकलन कंपनीच्या प्रोजेक्ट वर रुजू झाला होता. गेल्या २० वर्षांपासून, दर ११ सप्टेंबरला ते माझ्याशी फोन वरून गप्पा मारतात.’
त्यांना अजूनही त्यांच्या नाती कडून जी आता कॉम्पुटर आणि स्टॅटिस्टकस शिकते जी आता ऐन तारुण्यात आहे. तिच्याकडून कोणताही प्रतिसाद येत नाही. पण मला खात्री आहे की एक ना एक दिवस तिला नक्कीच कळेल की तिचे बाबा कोण होते आणि ती कोणत्या कुटुंबातून आली आहे. तो सोन्याचा दिवस लवकरच येईल जेव्हा आजोबा आणि नात पुन्हा एकत्र येतील. नाती बद्दलची सर्व माहिती इंटरनेट वरून मिळवली आहे. थत्ते परिवाराकडून नाही. वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण :आशिष नरसाळे
Tags: ९/११, ९/११ चे भीषण हत्याकाण्ड, ९/११ हत्याकाण्ड