अर्वाचीन भारताचा महापराक्रमी वीरबिजू (विजयानंद) पटनाईक (1916-1997)
बिजू पटनाईक हे असे एकमेव व्यक्तीमत्व होते की मृत्यूनंतर त्यांचे शव अनुक्रमे भारत, रशिया आणि इंडोनेशिया या तीन देशांच्या राष्ट्रध्वजात लपेटलेले होते. बिजू दोन वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री होते. बिजू पटनाईक हे वैमानिक होते. आणि दुसर्या महायुद्धात सोविएत युनियन अडचणीत असताना त्यांनी ‘डाकोटा’ हे लढाऊ विमान उडवून हिटलरच्या सैन्यावर बाॅम्बफेक केली आणि त्यामुळे हिटलरला माघार घ्यावी लागली. रशियाचा सर्वोच्च मानाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. आणि सोविएत युनियनने त्यांना आपले नागरिकत्व बहाल केले. जेव्हा कबालींनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा बिजू पटनाईक यांनीच 27 ऑक्टोबर 1947 रोजी दिल्ली ते श्रीनगर अशा अनेक विमानफेर्या केल्या आणि अनेक सैनिकांना श्रीनगरला पोचविले.
इंडोनेशिया ही एकेकाळी डचांची म्हणजेच हाॅलंडची वसाहत होती. आणि डच लोकांनी इंडोनेशियाचा भूभाग व्यापला होता. डच सैनिकांनी इंडोनेशिया भोवतीचा पूर्ण समुद्र आपल्या ताब्यात ठेवला होता आणि ते एकाही इंडोनेशियन नागरिकाला बाहेर पडू देत नव्हते. 1945 मधे इंडोनेशियाची डचांपासून मुक्तता झाली. पण पुन्हा जुलै 1947 मधे डचांनी इंडोनेशियन प्रधानमंत्री सुतान जहरीर यांना नजरकैद केले. सुतानने भारताकडे मदत मागितली.
त्यानंतर नेहरूंनी बिजू पटनाईकांना तत्कालीन इंडोनेशियन पंतप्रधान जहरीर यांना सोडवून भारतात घेऊन येण्यास सांगितले.
22जूलै 1947 रोजी बिजू पटनाईक आणि त्यांच्या बायकोने आपले डाकोटा विमान घेतले आणि जीवाची पर्वा न करता डचांच्या नियंत्रण क्षेत्रावरून उड्डाण करत ते तिकडे उतरले. आणि मोठे शौर्य दाखवत इंडोनेशियन पंतप्रधानांना सिंगापूर मार्गे सुखरूप भारतात घेऊन आले. या घटनेमुळे इंडोनेशियाला प्रचंड आत्मिक बळ आणि आत्मविश्वास मिळाला. आणि त्यांनी डच सैनिकांवर हल्ला केला आणि इंडोनेशियाला स्वतंत्र केले.
नंतर जेव्हा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकरणो यांच्या मुलीचा जन्म झाला तेव्हा त्यांनी बिजू पटनाईक आणि त्यांच्या बायकोला बाळाचे नाव ठेवण्यासाठी मुद्दाम निमंत्रित केले. बिजू पटनाईक आणि त्यांच्या बायकोने इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या मुलीचे नाव ‘मेघावती’ असे ठेवले.
इंडोनेशियाने उभयतांना 1950 मधे नागरिकत्व तसेच इंडोनेशियाचे भूमीपुत्र ही पदवी दिली.
नंतर त्यांना इंडोनेशियाचा सर्वोच्च मानाचा पुरस्कार ‘बिटांग जासा उत्मा’ इंडोनेशियाच्या 50 व्या स्वातंत्र दिनानिमित्त देण्यात आला. बिजू पटनाईक यांच्या निधनानंतर इंडोनेशिया मध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला. तर रशिया मध्ये एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला. आणि सर्व ध्वज खाली उतरवण्यात आले.
आपल्या इतिहासाच्या पुस्तकांनी कधीही वर्णन न केलेल्या अशा महान व्यक्तीबद्दल जेव्हा मला कळले तेव्हा मला खूप अभिमान वाटला. कालिंगा एअरलाईन्सची स्थापना बिजू पटनाईक यांनी 1947 मधे केली होती. जिचे नंतर राष्ट्रीयकरण होऊन 1953 मधे कालिंगा एअरलाईन्स इंडियन एअरलाईन्स मध्ये विलीन झाली.