आम्हि हिंदू राष्ट्र सनातन संघटना हे अमुचे जीवन॥धृ॥ नर वानर एकत्र गुंफुनी संघटनेची विशाल काया बुध्दीमंत हनुमंत उभारी दास्यमुक्तिचा भरुनी पाया उल्लंघुनिया संकटसागर मर्दन केला ससैन्य रावण॥१॥ संप्रदाय मतभेद माजले पाखंडाचा उधळे वारु अद्वैताचा शंख फुंकुनी पुजी पंचायतन जगद् गुरु विविधतेत एकता दाखवी आचार्यांचे अद्भुत दर्शन॥२॥ थोर महंतांकरवी केली सहस्त्रावधी मठस्थापना रामकथा ब्रम्हांड भेदुनी घुमवित