२६/११ चा एकमेव दहशतवादी अजमल कसाब हा त्याच्या चौकशीदरम्यान जिवंत पकडला गेला. ९/११ च्या अमेरिकेवरील हल्ल्याला २० वर्ष पूर्ण होत असताना जेव्हा मी मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याची ९/११ च्या हल्याशी तुलना करत होतो तेव्हा दोन्ही हल्ल्यातील सारखेपणा पाहून मला धक्का बसला दोन्ही दहशतवादी हल्ला झालेल्या राष्ट्रांना या हल्ल्याने मुळापासून हादरवून सोडले. आणि दोन्ही हल्ल्यांचे मास्टरमाईंड्स एकाच प्रदेशातून होते. अफगाणिस्तान/ पाकिस्तान.
आणि तिथे सारखेपणा संपतो. २६/११ ला भारताने ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्यापेक्षा अमेरिका कैक चांगल्या पद्धतीने ९/११ च्या हल्ल्यातून सावरताना किंवा त्याचा प्रतिकार करताना दिसली. याला कारणीभूत सगळ्यात पहिल्यांदा भारतीयांची विसरण्याची आणि पुढे जाण्याची वृत्ती आहे. ९/११ चा हल्ला अमेरिका आजही विसरलेली नाही. अमेरिकेत आजही ९/११ च्या हल्ल्यातील बळींचा सन्मान केला जातो. भारतात २६/११ हा दिवस येतो आणि जातो इतर सगळ्या दिवसांसारखाच. कदाचित त्या दिवसाच्या फक्त आठवणी काढल्या जातात. पण त्या तेवढ्यापुरताच.पण त्या दिवशी ज्यांनी शौर्याने काम केले त्यांचा सन्मान करण्याची आम्हाला फारशी चिंता वाटत नाही.
मुंबईत दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी हल्ला केला. त्यापैकीच एक ताज हॉटेल. आज दिमाखात उभ्या असलेल्या हॉटेल ला २६ नोव्हेंबर २००८ रोजी आगीने वेढले होते. निःशस्त्र असूनही अजमल कसाबचा सामना करणाऱ्या मुंबई पोलिसातील अधिकाऱ्यांची नावे सुद्धा आपण विसरलो आहोत. जेव्हा कसाबने गोळीबार सुरु केला तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याने त्याची बंदूक हिसकावून घेतली. त्याची अघ- ४७ बाजूला केली जेणेकरून त्या गोळ्या इतर कोणाला लागू नयेत. या प्रयत्नात त्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ( त्यांना ४० गोळ्या लागल्या ) पण त्याने दाखवलेल्या धाडसाने कसाब पकडला गेला. आणि तरीही आजही तुकाराम ओंबळे हे नाव मुंबईतील घराघरात सर्वश्रुत नाही.(त्यांना मरणोत्तर अशोक चक्र मिळाले. पण खेदाची गोष्ट ही की लोक आता त्यांना विसरत चालले आहेत).
या दहशतवादी हल्ल्याला बळी पडलेल्या अधिकाऱ्यांच्या परिवारामुळे ते लक्षात राहतात ( ताज हॉटेलच्या बाबतीत हॉटेल च्या नावावरून किंवा ठिकाणावरून ) पण अमेरिकेने जसा ९/११ हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांचा सन्मान केला तसा कधीच आपण करत नाही. ९/११ चा हल्ला यशस्वीपणे परतवून लावण्यात अमेरिकन गुप्तचर संघटना आणि सुरक्षाव्यवस्था पूर्णपणे अयशस्वी झाल्या असे लोक म्हणतात. ओसामा बिन लादेन बाहेर आहे आणि आणखी हल्ल्याची तयारी करत आहे हे सर्वांना माहीत असतानाही CIA हा हल्ला रोखू शकली नाही. अमेरिकेतील विमानतळ सुरक्षा हा एक विनोदच होता. त्यामुळेच दहशतवादी विमानाद्वारे शस्त्र घेऊन जाऊ शकले. मुद्दा हा आहे की या झालेल्या चुकांवर अमेरिकेने बारकाईने काम केले. इंटेलिजन्सच्या सक्षमीकरणावर भर दिला गेला. चौकशी समित्या नेमल्या गेल्या. आणि गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेत दुरुस्त्या करण्यात आल्या.
पोलीस अधिकारी तुकाराम ओंबळे यांना श्रद्धांजली वाहताना. मुंबई पोलीस अधिकारी ज्याने कसाबला पकडले पण तसे करताना तो मारला गेला. भारताच्या बाबतीत २६/११ चे अपयश जास्त गंभीर होते. हल्ल्याच्या वेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले एम के नारायणन यांनी लिहिले आहे की उपलब्ध गुप्त माहिती अपुरी होती. पण ते खरे होते का? CIA ने २६/११ ची योजना आखणाऱ्या गटात (कदाचित डेविड हेडलीच्या माध्यमातून) घुसखोरी केली होती आणि सांगितले होते की मुंबईतील समुद्रकिनारी असलेल्या हॉटेल्स वर हल्ला होणार आहे. भारतीय गुप्तचर संघटनेने दावा केला आहे की त्यांनी दहशतवाद्यांना मुंबईत आणणाऱ्या बोटीतून रेडिओची प्रसारणे ताब्यात घेतली होती. आणि ही माहिती वरील अधिकाऱ्यांना कळवली होती. (इथेच नारायणन यांच्यावर संशयाची सुई थांबते) पण त्यावर कारवाई झाली नाही.
हल्ले सुरु झाल्यावर ठअथ ला पाकिस्तान मधील दहशतवादी आणि त्यांचे सहकारी यांच्यातील संभाषणे ऐकता येत होती. कारण त्या टेप्स सार्वजनिक केल्या होत्या. त्यामुळे दहशतवादी कशाप्रकारे पुढे जाऊ शकतात याची माहिती सरकारकडे होती. आणि तरीही आम्ही चुकांमागून चुका केल्या. आम्हाला माहित होते की मीडिया रिपोर्ट्सचे निरीक्षण केले जात आहे. आणि त्यातील माहिती हल्लेखोरांपर्यंत पोहोचत होती. पण तरीही कोणीही प्रसारमाध्यमांना इशारा दिला नाही किंवा हल्ले झालेल्या ठिकाणचे प्रक्षेपण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.
छाबडा हाऊसच्या छतावरील कमांडो खालच्या मजल्यावरील धोक्याच्या पातळीचे मूल्यांकन करताना. त्यामुळेच पाहुणे ताजमहाल हॉटेलच्या चेम्बर्स मध्ये लपून बसल्याचे अतिरेक्यांना त्यांच्या साथीदारांनी सांगितले. कारण सगळ्याचा टेलिकास्ट प्रसारमाध्यमांवर दाखवला जात होता. त्याक्षणी कोणीही मीडियाला थांबवायची किंवा टेलिकास्ट डिले करण्याची तसदी घेतली नाही. म्हणून तेथे लपलेल्या दहशतवाद्यांना आधीच ठाऊक होते की NSG चे कमांडो येत आहेत. म्हणून ते आल्यावर अतिरेक्यांनी गोळीबार केला ज्यात एक कमांडो ठार झाला. ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकन लोकांनी केलेल्या विस्लेषणाची जबाबदारी कोणाकडेही नव्हती. नारायणन आनंदाने त्यांच्या पदावर राहिले. (राज्यपाल बनण्या पूर्वी) तर काहींचा लोक हितासाठी बळी गेला.
दहशतवाद्यांशी लढण्यासाठी कमांडोनी ताज हॉटेलच्या परिसरात पोजिशन घेतली. सुरक्षा आणि गुप्तहेर यंत्रणांतील काही त्रुटी आता दूर करण्यात आल्या आहेत असे नारायणन यांनी सांगितले. आणि खरंच काही त्रुटी दूर झाल्या आहेत. NSG ज्यांना त्यावेळेस वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधांमुळे मुंबईत पोचायला उशीर झाला होता. त्यांच्याकडे आता स्वतःचे विमान आहे. प्रमुख शहरांमध्ये कमांडो युनिट्स आहेत. (मुंबई पोलिसांनी अतिरेक्यांना हॉटेल मध्ये गुंतवून ठेवण्यास नकार दिला कारण ते धोकादायक होते. तुकाराम ओंबळे यांनी शौर्य दाखवले असले तरी शहरातील पोलीस दल अद्याप चांगल्या स्थितीत आहे की नाही याबाबत मला शंका वाटते.) पण नारायणन ही भविष्याबद्दल खात्री देत नाहीत.
इंडियन एक्सप्रेस मध्ये लिहिताना ते इशारा देतात की अफगाणिस्तान मध्ये तालिबान कडून झालेल्या हल्ल्यामुळे अतिरेक्यांना भारताविरुद्ध दहशतवादी कारवाई करण्यास आणखी सोप्पे जाईल. ते बरोबर आहेत. आय सी ८१४ या विमानाचे अपहरण तालिबाननेच १९९९ साली कंदहार मध्ये घडवून आणले. ज्यामुळे ९/११ आणि २६/११ मधील शेवटचा फरक लक्षात आला. न्यूयॉर्क वरील हल्ले हे अल कायदाचे काम होते. अफगाणिस्तानात नियोजित केलेले. आणि ते बहुदा सौदीनी केले असावे. ज्यांना अमेरिका नॉन स्टेट ऍक्टर म्हणते.
अमेरिकेने ड्रोन हल्ले करून अनेक दहशतवाद्यांना ठार केले आणि अल कायदाला नामोहरम केले. लादेनला स्वतः अमेरिकन सील टीमने ठार मारले होते. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहिल्या हल्ल्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्मारकाला श्रद्धांजली वाहताना एक पोलीस अधिकारी. भारताच्या बाबतीत धमकी नॉन स्टेट कलाकारांकडून नव्हे तर ती एका राज्यातून येते – पाकिस्तान.
जग भारताला पाकिस्तान मधील दहशतवादी तळांवर हल्ले करण्याची परवानगी देणार नाही. कारण हे अणू युद्धात रूपांतरित होऊ शकते. आणि आपण जरी तसे केले तरी पाकिस्तान नवीन ठिकाणी, नवीन दहशतवाद्यांना शस्त्र पुरवेल. हाच सगळ्यात मोठा फरक आहे. अमेरिका त्यांच्यावर हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्यांकडून भयंकर किंमत वसूल करू शकते. याउलट भारताने स्वतःच मागे हात बांधून कंबर कसून दहशतवादाविरुद्ध च्या लढाईत उतरायला हवे. नव्हे काही अंशी तो उतरला आहे असे म्हणायला हरकत नाही. पण तालिबान मध्ये झालेल्या प्रकाराने भीतीची टांगती तलवार अजूनही कायम आहे असे म्हणावे लागेल. कारण यामुळे पाकिस्तानचे बळ वाढेल, जे धोकादायक आहे.
Tags: २६/११, ९/११