नव्या युगाची हाक अम्हाला झेप आमुची यशाकडे धमक कुणाची अडवायाची गती आमुची पुढे पुढे ॥ध्रु.॥ नरसिंहाचे वंशज आम्ही रिपुरक्ताचे शिंपु सडे बलवत्तर बाहूंवर तोलू आपत्तीचे घोर कडे ॥१॥ भीषण झंझा मोह निशा वा करु दे नर्तन चोहिकडे आकाशीची कुऱ्हाड पडु दे तरिही राहू अढळ खडे ॥२॥ विजयश्रीला जिंकुन आणू उन्मत्तांना चारु खडे खेचुन आणू स्वर्ग







