आम्हि हिंदू राष्ट्र सनातन संघटना हे अमुचे जीवन॥धृ॥
नर वानर एकत्र गुंफुनी संघटनेची विशाल काया बुध्दीमंत हनुमंत उभारी दास्यमुक्तिचा भरुनी पाया उल्लंघुनिया संकटसागर मर्दन केला ससैन्य रावण॥१॥
संप्रदाय मतभेद माजले पाखंडाचा उधळे वारु अद्वैताचा शंख फुंकुनी पुजी पंचायतन जगद् गुरु विविधतेत एकता दाखवी आचार्यांचे अद्भुत दर्शन॥२॥
थोर महंतांकरवी केली सहस्त्रावधी मठस्थापना रामकथा ब्रम्हांड भेदुनी घुमवित होती दाहि दिशांना समर्थ शिवशक्तिने नांदवी निर्भय स्त्री मंदिर गो ब्राम्हण॥३॥
मरगळलेल्या राष्ट्रामधली होता जागृत अमर चेतना सप्तसिंधु ओलांडुन गेली हिंदुत्त्वाची सिंहगर्जना दिली विवेकानंदे शिकवण समाजसेवा हे प्रभुपूजन॥४॥
संघटनेस्तव संघटनेची अमृतविद्या सांप्रतकाळी राष्ट्राचे संजीवन करण्या केशवरुपे जणु अवतरली लक्षलक्ष तरुणांत स्फुरतसे सर्वस्वाचे सहज समर्पण॥५॥
Your email address will not be published. Required fields are marked *