डौलांत फडक तू नभांतरी॥धृ॥
रुप तुझे ते उदात्त उ,वल
अक्षय ठसले हृत्पटलावर
ध्यास लागला तुझाच दृढतर
मी प्राणपणे तुज धरी करी॥१॥
विेश पाहिले मी तव ठायी
मोक्ष देखिला तुझ्याच ठायी
अन रमलो मी तुझ्याच पायी
झालीत वादळे शांत उरी ॥२॥
सुप्त शक्ति तव ठायि दिव्यतर
मज झाला तत्साक्षात्कार
अन ओळखिले मज मी सत्वर
त्वत्तेज उजळले हृदंतरी॥३॥
कर्तृत्वाच्या विेशासावर
अविचल श्रध्दा भक्ति बळावर
जीवन माझे निर्भय निर्भर
रे नेइन तुज वैभवशिखरी॥४॥
कळिकाळाशी टक्कर देइन
सावरीन कोसळते गगन
सप्त समुद्रे तव पद न्हाणिन
परि असो एक तव कृपा शिरी॥५॥
मम ध्येय ध्वजा जा वरी वरी
Your email address will not be published. Required fields are marked *