नव्या युगाची हाक अम्हाला झेप आमुची यशाकडे धमक कुणाची अडवायाची गती आमुची पुढे पुढे ॥ध्रु.॥
नरसिंहाचे वंशज आम्ही रिपुरक्ताचे शिंपु सडे
बलवत्तर बाहूंवर तोलू आपत्तीचे घोर कडे ॥१॥ भीषण झंझा मोह निशा वा करु दे नर्तन चोहिकडे
आकाशीची कुऱ्हाड पडु दे तरिही राहू अढळ खडे ॥२॥ विजयश्रीला जिंकुन आणू उन्मत्तांना चारु खडे
खेचुन आणू स्वर्ग धरेवर आम्ही छातीचे निधडे ॥ ३॥ मृत्यूलाही तुडवुन जाऊ ध्येयपथावर नित्य पुढे
व्यक्तिव्यक्तिचे हृदय पेटवू करी घेउनी दीप्त चुडे ॥४॥ स्वदेश उठता दिशा दिशांतुन कोण करंटा देत दडी
देशभक्तिविण जीवन म्हणजे प्राणावाचुन व्यर्थं कुडी ॥५॥ देशासाठी जन्म आमुचा भूातेस्तव देह पडे
मरू न आम्ही जगास देऊ अमरत्वाचे नवे धडे ॥६॥
Your email address will not be published. Required fields are marked *