स्नेहसूत्र हे करी धरावे स्नेहसूत्र हे करी धरावे
संघटनेला ह्रदय वहावे॥धृ॥ बंधुत्वाचे विस्मृत नाते ह्रदयी अमुच्या आज जागते तेच निरंतर जगवायाते
श्रध्देचे वरदान मिळावे॥१॥ मणिबंधावर जर हे कंकण तर ह्रदयांतिल उजळे कणकण नैराश्याचा तिमिर झुगारुन
तेजोय मनमंदिर व्हावे॥२॥ अखंड निष्ठा दृढ अनुशासन प्रबल संयमित घडविल जीवन सहज कुठेतरि घडता स्पंदन
घरोघरी स्वर तेच उठावे॥३॥ सुखदु:खाची समान जाणिव या भूीचे घडविल वैभव वीरव्रताचा करण्या आठव
रक्षाबंधन अमर रहावे॥४॥
Your email address will not be published. Required fields are marked *