ही पवित्र माझी माता धरती येथे कर माझे जुळती || Rss Geet ||
ही पवित्र माझी माता धरती येथे कर माझे जुळती ॥ धृ. ॥
याच कणांतून मानवतेचा आदिम अंकुर डोले
याच कणांनी वेदान्ताचे बोल अमर ऐकविले
याच कणांना हलवित गेली प्रभु रामाची हाक
याच कणांशी एकज़ीव हो चितोडची ती राख
याच कणांनी श्रीशिवबाचि घडली चेतन मूर्ती ॥ १॥
नव्हे मृत्तिका चैतन्याचे प्रतिक माझी आई
तिच्या जीवनातुन तेजाचा अखंड निर्झर वाही
तिने पाजले स्तन्य मधुरतम धर्माचे आम्हास
तिच्याच जीवित्वावर असती निर्भर अमुचे शास
संकटावरी मात कराया हीच एकली स्फुर्ती ॥ २ ॥
अमृतकुंभा जिंकायला लागे गरुडभरारी
हलाहलाचे विष पचवाया समर्थ हो त्रिपुरारी
या शक्तिचे आवाहन का श्रध्देविना घडेल
या श्रध्देची पुजा देवी बोला कुठे असेल
या आईविण वदा कोण मग करिल इच्छापूर्ती ॥ ३ ॥
अम्हांस लागे पिसे आमुच्या आईचे दिनरात
सुखदु:खाशी तिच्या आमुच्या जीवन हे निगडीत
मिळेल जो जो तया देउ या वेडाचे हे वाण
या वेडामधि शतशत असतिल गेलेले रंगुन